चिपळूणात खवले मांजरांची तस्करी, पाचजणांना रंगेहात पकडले

1285

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांना चिपळूण पोलिसांनी फरशी तिठा येथे रंगेहात पकडले. त्यांच्याकडील 80 हजार रुपयांची दोन जिवंत खवले मांजर, टियागो कार आणि महिंद्रा मॅजिक पोलिसांनी जप्त केली आहे.

चिपळूणात खवले मांजर विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. त्याचवेळी गुहागरच्या दिशेने महिंद्रा सुप्रो गाडी फरशी तिठा जवळ थांबली. गाडीतून दोघेजण उतरले ते कुणाची तरी वाट पहात असताना खेडच्या दिशेहून टियागो कार आली. त्या कारमधून तिघेजण उतरले. त्या पाच जणांची चर्चा सुरू असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडील सफेद रंगाच्या पिशवीत दोन जिवंत खवले मांजरे होती. विक्रीसाठी आलेले दोघे आणि खरेदीसाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये संदीप पवार वय 25 रा.ओवळी चिपळूण, मनोज मिरजोळकर वय 40 रा.भिंगरोळी मंडणगड, विजय मोरे वय 27 रा.मांडवे खेड, सुनील मालसुरे वय 46 रा.वोरीचा माळ मंडणगड, आत्माराम सपाटे वय 72 रा.सपाटेवाडी मंडणगड यांचा समावेश आहे. चिपळूणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हि कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या