चिपी विमानतळावरुन 26 जानेवारीपासून विमान झेपावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपी विमानतळावरुन 26 जानेवारी 2021पासून विमान झेपावणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्गवासियांना असलेली विमानसेवेची प्रतीक्षा आता संपणार आहे. येत्या 26 जानेवारीपासून चिपी विमानलळावरून विमानसेवा सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. 26 जानेवारी 2021 पासून चिपी विमानतळ कार्यान्वित होणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.