चिपळुणात महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण येथे एका महिलेवर अनोळखी इसमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. पीडित महिलेने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी शोध घेत दोन दिवसात त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

17 जून रोजी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास चिपळूण परिसरातील भोगाळे परिसरात एका महिलेचा पाठलाग करुन तिच्यावर एका पुरुषाने लैंगिक अत्याचार केला होता. अत्याचार केल्यानंतर तो पुरुष पळून गेला. पिडित महिलेने पोलीसांना त्या व्यक्तीचे वर्णन सांगितले.

त्या वर्णनानुसार पोलिसांनी चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. एका बातमीदाराकडूनच पोलीसांना त्या आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. अजून त्या आरोपीची ओळख परेड व्हायची असल्यामुळे त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सचिन बारी, पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरिक्षक मोहन बेग, संतोष शिंदे, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, प्रमोद कदम, कृष्णा दराडे, आदिती जाधव, वर्षा शिंदे, श्रीकांत झगडे, मणेर, नरेश पेडामकर, अतुल ठाकूर, लालजी यादव, वैभव शिवलकर, गांधी, नंदकुमार कांबळी, महेंद्र केतकर यांनी कारवाई केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे निरिक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.