…म्हणून एनडीएची साथ सोडली, चिराग पासवान यांनी सांगितले कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने एनडीएची साथ सोडली असून बिहार निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. आपले भाजपशी वैर नसून नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही असे लोजपने जाहीर केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी आपण एनडीए सोडल्याचे चिराग पासवान यांनी सांगितले. तसेचा हा सल्ला आपल्याला खुद्द आपले वडिल रामविलास पासवान यांनी दिला होता असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना चिराग पासवान म्हणाले की, “माझे वडिल रामविलास पासवान यांनीच मला सल्ला दिला होता की जर पक्षाला वाढवायचा असेल तर ही निवडणूक स्वबळावर लढवली पाहिजे, याबाबत मी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही बोललो होतो पण शहा यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही” असे चिराग पासवान म्हणाले.

चिराग पासवान जेव्हा अमित शहा यांना भेटले तेव्हा त्यांनी एनडीच्या कार्यक्रम पत्रिकेवर बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट हा कार्यक्रम घेण्यास सांगितले. तसेच एनडीने लोजपला जेवढ्या जागा देऊ केल्या होत्या तेवढ्या जागांवर लढणे कठील असल्याचे चिराग पासवान यांनी सांगितले. जदयूविरोधात लोजप आपले उमेदवार उभे करतील असे लोजपने जाहीर केले होते त्यानंतरही अमित शहा यांनी मौन साधले होते. भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांच्या समोरच सगळ्या गोष्टी घडत होत्या म्हणून आपण एनडीतून बाहेर पडण्याचा निर्णह घेतल्याचे त्यांनी सांगितले.