चिरनेर येथे पाच कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चिरनेर

चिरनेर गावाला नेहमी पुराचा तडाखा देणाऱ्या चिरनेरच्या मध्यवर्ती नाल्याचे खोलीकरण व संरक्षण भिंत बांधण्याच्या विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या विकासकामासाठी एम एम आर डी ए कडून पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.पर्यायाने पुढील काळात चिरनेरवासीयांना पुरसंकटातून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

ऐतिहासिक चिरनेर गावाच्या मध्यातून डोंगरातील पाणी वाहून नेणारा मुख्य नाला आहे. पावसाळी दिवसात चिरनेरच्या डोंगर परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी या नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाहून येत असल्याने चिरनेर गावात भयंकर पूरस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे नागरिकांना मोठे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यातच या नाल्यात अतिक्रमणे वाढल्याने दरवर्षी पुराची परिस्थिती अत्यंत बिकट बनत आहे.

या पुरस्थितीतून चिरनेरच्या जनतेला बाहेर काढण्यासाठी जेएनपीटीचे विश्वस्त भाजपा नेते महेश बालदी यांनी एमएमआरडीए च्या माध्यमातून या नाल्याच्या खोलीकरण व संरक्षण भिंत बांधण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामाचा शुभारंभ आज रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा सिडकोचे चेअरमन प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, उद्योजक पी पी खारपाटील, राजाशेठ खारपाटील, सरपंच संतोष चिर्लेकरआदी उपस्थित होते.