Video – चंद्रपूरमध्ये कुपोषित मुक्तीचा कार्यक्रम, आमदार सुभाष धोटे यांची उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेवा कलश फाउंडेशन आणि ‘बाळू’ या सामाजिक संस्थेच्या वतीने कुपोषित मुक्तीचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना आणि जिवती या तीन तालुक्यात आदिवासीबहुल क्षेत्रात कुपोषणाची मोठी समस्या आहे. दुर्गम भाग आणि दळणवळणाची अपुरी साधने यामुळे या तालुक्यातील आदिवासींपर्यंत शासनाच्या सोयीसुविधा पोचत नाहीत. पावसाळ्यात तर स्थिती आणखी गंभीर होते. या पार्श्वभूमीवर उपरोक्त सामाजिक संघटनांनी सुरू केलेला कुपोषण मुक्तीचा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

या उपक्रमात कुपोषित मुलांना पोषण आहार आणि गरोदर मातांना सकस आहार देण्यात येणार आहे. राजुरा इथं आयोजित कार्यक्रमात अशा कुपोषित मुलांना आणि गरोदर मातांना पोषण आहार वितरित करण्यात आले. राजुराचे आमदार सुभाष धोटे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी कुपोषण मुक्तीचा संकल्प करण्यात आला.