शेफने बनवला ६५ किलोंचा चॉकलेटचा गणपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जालंधर

आज गणेश चतुर्थी. गणेशोत्सवाचा उत्साह ओंसडून वाहत आहे. घराघरांत आज बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाची अनेक रुपे पहायला मिळत आहेत. जालंधरच्या एका हॉटेल मालकाने गणपतीचे वेगळेच रुप समोर आणलले आहे. या हॉटेल मालकाने पर्यावरणस्नेही अर्थात इको फ्रेंडली असा चॉकलेटचा गणपती बाप्पा बनवला आहे.

मूळचे जालंधरचे हरजिंदर सिंग कुकरेजा यांनी तब्बल ६५ किलोचा चॉकलेटपासून बनवलेल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली आहे. ही मूर्ती बनवायला २० शेफनी १० दिवस मेहनत घेतली आहे. याबद्दल कुकरेजा यांनी आपल्या ट्विटरवरून या चॉकलेट बाप्प्पाचा फोटो शेअर केला आहे.