
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
‘चौकीदार चोर हैं’ हे सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करून दिलगिरी व्यक्त केली. भाजप नेतेदेखील राफेल खरेदीप्रकरणी न्यायालयाने क्लीन चिट दिल्याचे वक्तव्य करत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. राफेल किमाने खरेदीप्रकरणी फेरकिचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी फेटाळून लावत नव्याने सादर करण्यात आलेली कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर हैं’ हे न्यायालयाला मान्य असल्याचे वक्तव्य केले होते. त्याकर आक्षेप घेत भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली आहे.





























































