
वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावातून पालिकेने तीन दिवसांत तब्बल दहा मेट्रिक टन कचरा काढल्याने तलाव स्वच्छ आणि चकाचक झाले आहे. पितृपक्षात या ठिकाणी झालेले पिंडदान आणि पूजा साहित्य थेट तलावात सोडल्याने शेकडो मासे मरण पावले होते. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावात पितृपक्षात मुंबईतील नागरिक पिंडदानासाठी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धार्मिक विधीनंतर पिंडदानाचे साहित्य, निर्माल्य तलावात टाकू नये, असे आवाहन केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले होते.