उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; दोन जणांचा मृत्यू, पाचजण ढिगार्‍याखाली अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण ढिगार्‍याखाली अडकली आहेत. ढगफुटीमुळे 7 घरांचे नुकसान झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार धारचुला भागातील जुम्मा गावात ढगफुटी झाली आहे. मुख्यमंत्री धामी यांनी ट्विट करून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन झाले होते त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गढवाल भागाचे हवाई सर्वेक्षण केले होते.

धामी यांनी रविवारी सकाळी गढवाल भागातील देवप्रयाग, तोताघाटी, तीनधारा, कौडियाला, ऋषिकेश, रानीपोखरी, नरेंद्रनगर, फकोट आणि चंबा भागात हवाई सर्वेक्षण केले होते.

यापूर्वी गेल्या आठवड्यात मंगळवारी खाबडाला गावात सताला देवी मंदिराजवळ ढगफुटीमुळे नद्या नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे अनेक घरात पाणी शिरले होते. तर विजेचे खांब आणि झाडं कोसळली होती. सुदैवाने तेव्हा कुठलीही जीवितहानी झाली नव्हती.