कामगार रुग्णालयाच्या आगीची चौकशी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. या चौकशीमुळे रुग्णालयाला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.

रुग्णालयाच्या अग्निकांडाची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आगीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी डॉक्टर प्रयत्न करीत आहेत. कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या आवारातच कर्मचाऱयांचा ठिय्या
अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्यामुळेच अंधेरीच्या कामगार रुग्णालयात आगीचा भडका उडाल्याचे समोर आल्यामुळे आता कामगारांमध्ये भीतीची दहशत पसरली आहे. जीव धोक्यात घालून काम कसे करणार, असा सवाल कामगार विचारत आहेत. अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱया रुग्णालय प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचा आरोप करीत शेकडो कर्मचाऱयांनी मंगळवारी रुग्णालयाच्या आकारातच ठिय्या मांडला.