विधानसभा निकालाआधी मुख्यमंत्री फडणवीस केदारनाथ चरणी नतमस्तक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. राज्यात सरासरी 60 टक्क्यांपर्यंत मतदान झाले. मतदान पार पडल्यानंतर अनेक संस्थांनी एक्झिट पोलद्वारे निकालाचा अंदाज वर्तवला. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या 24 ऑक्टोबरला सकाळपासून हळूहळू 288 जागांचे निकाल स्पष्ट होत जातील. निकालापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले आहे.

बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्नी अमृतासोबत उत्तराखंडमध्ये केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. मुख्यमंत्र्यांची सपत्नीक केदारनाथाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर याचे फोटो पोस्ट करत स्वत: फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. निकालाआधी केदारनाथाच्या दर्शनाला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी भगवान शंकराला नक्की काय मागितले असावे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

‘सकाळी केदारनाथाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले. हर, हर महादेव!’, अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर केली आहे.