मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींकडून विधान परिषद भंग

1012

आंध्र प्रदेशच्या जगन मोहन रेड्डी सरकारने विधान परिषद भंग करण्याच निर्णय घेतला आहे. व्हायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी ही माहिती दिली आहे. सकाळी हा निर्णय घेतला असून कॅबिनेटच्या बैठकीनंतर विधानसभेचे विशेष सत्र सुरू होणार आहे.


कॅबिनेट बैठकीनंतर विधानसभेचे विशेष सत्र सुरू होणार आहे. या सत्रात विधान परिषद भंग करण्यावर चर्चा होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याची माजी मुख्यमंत्री व टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे आपल्या आमदारांसह विधानसभा सत्रावर बहिष्कार टाकणार आहेत. रविवारी नायडू यांनी आपल्या आमदारांसोबत बैठक बोलावली होती, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेत 58 सदस्य आहेत. आंध्र राज्याची एकहाती सत्ता जगन मोहन रेड्डी यांच्या हातात आहे. परंतु विधान परिषदेत टीडीपीकडे बहुमत आहे. परिषदेत टीडीपीचे 27 सदस्य असून व्हायएसआर काँग्रेसचे 9 आमदार आहेत. जगन मोहन रेड्डी यांचा तीन राजधानींचा महत्वाकांक्षी प्रकल्प विधान परिषदेत नायडून यांनी पास होऊ दिला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री रेड्डी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या