
दिल्ली झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.
दिल्लीत CAA विरोधातील झालेल्या आंदोलनात हिंसाचार उफाळला होता. त्यात एका पोलीस कॉन्स्टेबलसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शांततेचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी तणापूर्ण शांतता आहे. दंगलग्रस्त भागातील सर्वपक्षीय आमदारांची बैठकी त्यांनी बोलावली आहे.
दिल्लीत सलग तिसर्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. आज सकाळी मौजपूर, बाबरपूर आणि जाफराबादमध्ये आंदोलकांनी दगडफेक केली. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.




























































