मुख्यमंत्री पर्रिकर रविवारी गोव्यात येणार, लवकरच कार्यभार सांभाळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी 

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रविवारी गोव्यात दाखल होणार आहेत. सध्या दिल्ली येथील एम्स मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दिल्लीत सुरू असलेले उपचार ते घरी घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.  मुख्यमंत्री गोव्यात नसल्याने राजकीय परिस्थिती चिघळली आहे. पर्रिकर रविवारी गोव्यात दाखल होऊन उपचार घेतील व लवकरच कार्यभार सांभाळतील.