पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगरजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी जागतिक स्तरावरील  सल्लागार नियुक्त करा असे आदेश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

यासंदर्भात ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. पैठणला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. संभाजीनगरला आलेले पर्यटक आवर्जून पैठणला भेट देतात. तेथे जायकवाडीसारखे देशातले मोठे धरण आहे. त्यामुळे या संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था दूर करा. 

लोकांमधून चांगल्या नावीन्यपूर्ण कल्पना मागवा असे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे उपस्थित होते.