
उत्तर भारतीयांच्या छटपूजेचा उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरा करण्यात यावा. कोरोनाकाळ असल्याने गर्दी न करता घरीच राहून उत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
उत्तर भारतीयांचा छटपूजा हा उत्सव समुद्रावर जाऊन पूजाअर्चा करून साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन होणारा संसर्ग टाळण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.
- कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी, तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी.
- कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विभाग स्तरावर ‘कोविड – 19’ करिता वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची चाचणी (Antigen / PCR Testing) करण्यात यावी.
- कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावा.
- अशा ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी
कृत्रिम तलावांची निर्मिती करा
छटपूजेसाठी पृत्रिम तलावांची निर्मिती करा. फटाके, आतषबाजी, ध्वनिक्षेपक यांना बंदी घाला. मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम कटाक्षाने पाळा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.


























































