शिवसेनेच्या सामाजिक उपक्रमांमुळे सर्वसामान्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी काही ठिकाणी रक्तदान शिबीर, पूरग्रस्तांसाठी वस्तू, अन्नधान्य, कापडी पिशव्या तसेच छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत 10 हजार देशी प्रजातीच्या वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रमाची सुरुवात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपमहापौर सुहास वाडकर, आमदार-विभागप्रमुख विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवत्त्या संजना घाडी, आयोजक सिद्धेश कदम, शशिकांत झोरे, नगरसेवक संजय घाडी, रिद्धी खुरसंगे, गीता सिंघण, विभागसंघटक सुजाता शिंगाडे, विधानसभाप्रमुख उदेश पाटेकर, चेतन कदम, शुभदा शिंदे, शीला गांगुर्डे, युवा विभाग अधिकारी विजय रांजणे, अमित मोरे, प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.

tree-plant

शिवसेना शाखा क्र. 206 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, आमदार अजय चौधरी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे उपस्थित होते. शिबिरातून 532 रक्त पिशव्या जमा करण्यात आल्या. शिबिराला महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख पराग चव्हाण, विधानसभा संघटक सुधीर साळवी, लता रहाटे आदींनी भेट दिली.

blood-camp

भांडूप येथील स्व. दिना बामा पाटील इस्टेट येथे राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराने मोफत लसीकरण केंद्रांचे उद्धघाटन शिवसेना पक्षाचे सचिव आदेश बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जीवनावश्यक धान्य किट, छत्री वाटप केले.

bhandup

वरळी गांधीनगर येथे शिवसेना शाखा क्र. 198च्या वतीने अल्पोपाहार वाटला. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, शाखाप्रमुख दीपक बागवे, महिला उपशाखासंघटक लक्ष्मी कांबळे, संपदा परब, दीनानाथ चौगुले, राजेश कदम, शिवाजी करपे, मनोज वारंग, प्रकाश येरुणकर उपस्थित होते.

worli