मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजपथावरील संचलनातील उपविजेत्या कॅडेट्सचे अभिनंदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या शिबीर आणि राजपथावरील संचलनातील उत्कृष्ट कामगिरीद्वारे पंतप्रधान बॅनरच्या उपविजेत्याचा मान पटकाविणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाच्या चमुचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

देशातील सर्वोत्तम कॅडेट ठरलेल्या छात्र सैनिक कशीष मेथवानी तसेच उत्कृष्ट कामगिरी आणि नेतृत्व करणारे छात्र सैनिक उपकार ठाकरे, समृध्दी संत, विवेक सिंग, तनाया नलावडे, मार्गदर्शक कर्नल प्रशांत नायर यांच्यासह सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.