
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


























































