राज्यात सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट झाला आहे, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना लगावला. भक्त आणि अंधभक्त यात फरक असतो. भक्त हा आपल्या दैवताच्या विचारांवर आयुष्यभराची वाटचाल करतो, तर अंधभक्त फक्त उदोउदो करत सुटतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लिहिलेल्या ‘आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी-कॉन्टेम्पररी रिलीव्हन्स’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रकाशन केले त्यावेळी ते बोलत होते.

ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानवंत-प्रज्ञावंत असलेल्या बाबासाहेबांचे विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात. बाबासाहेबांनी केवळ घटनाच लिहिली नाही तर पुढे निर्माण होणाऱया अडचणी, अडथळेही त्यांनी आपल्याला दाखवले. त्यावर उपायही सुचवले. पण हे कोण लक्षात घेतो, असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून, नमस्कार करून बाबासाहेब आपल्याला कळतात का, बरं कळले तरी आपण त्यांनी जे विचार सांगितले ते समजून घेऊन वागतो आहोत काय याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नागपुरात झालेल्या या कार्यक्रमाला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, इंडियाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. केव्हीन ब्राऊन, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जीवाला जीव देणारे सहकारी

माझे मंत्रिमंडळातील सहकारी जीवाला जीव देणारे असून नितीन राऊत यांनी अभ्यास करून एका महामानवाच्या विचारांवर लिहिलेले हे पुस्तक आहे. राजकारणी अभ्यासू असतो हे राऊत यांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन राऊत यांचे काwतुक केले.

अंधभक्तांचे दैवत सोयीनुसार बदलते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भक्ती करताना अंधभक्तांसारखी करू नका, कारण अंधभक्तांचे दैवत हे सोयीनुसार बदलत असते. तर खऱया भक्तांचे दैवत कधीही बदलत नाही. त्यामुळे आंबेडकरांचे खरे भक्त बना, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.