
महाराष्ट्राने अतिशय जबाबदारीने कोरोनाची लढाई लढली. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करीत आणला असला तरी येणाऱया कर्षात बेसावध राहू नका. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. आव्हाने कमी होणार नसली तरी शासन यंत्रणा कृतिशील आणि गतिमान असून येणाऱया वर्षात कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्रात आपण विविध मार्गांनी कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करीत आणला असला तरी येणाऱया कर्षात बेसावध राहू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढील काळाचा अंदाज बांधणे अवघड
एक नवीन जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंब आपण करीत आहोत. वर्क प्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण यासारख्या बाबतीत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण उपयोग करीत आहोत. पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्कांना मिळेल हा एक भाग झाला, पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रूपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
सरकार कृतिशील आणि गतिमान
आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतिशील आणि गतिमान आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे नेहमीच येतात परंतु त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करूया, असे सांगतानाच सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा अतिशय जिद्दीने सामना करीत असलेल्या डॉक्टर्स, पोलीस, शासकीय आणि महापालिका कर्मचाऱयांना तसेच स्वयंसेवकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आता मागे परतायचे नाही!
आपण पुनश्च हरिओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषतः नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नक्या कर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.



























































