फक्त पाच ते सात दिवसांचाच रक्तसाठा चला…रक्तदान करूया! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रक्ताची टंचाई भासत आहे. अवघे पाच ते सात दिवसांचाच रक्तसाठा रुग्णालयांत असून रक्ताची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना जीवनदान देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा, रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

रक्तपेढय़ा तसेच रुग्णालयांत मोठय़ा प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. परंतु रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे जनतेला आवाहन केले.

रक्तदान यज्ञ करा

राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोटय़ा- छोटय़ा रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनीदेखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या