
कोरोना हे 100 वर्षातले मोठे संकट आहे, परंतु उत्तर प्रदेश सरकारने हे संकट रोखले अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. तसेच योगींच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये वैद्यकीय महाविद्यालय चार पटीने वाढले असे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीत विकास कामांचे उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी उपचारासाठी इथल्या नागरिकांन मुंबईत जावे लागत होते, परंतु योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा सुधारल्या आणि नागरिकांना राज्यातच उपचार मिळू लागले. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात चार पटींनी वैद्यकीय महाविद्यालय वाढली आहेत. कोरोना हे 100 वर्षातील सर्वात मोठे संकट आहे. परंतु या संकटातही काशी थांबली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रोखण्यात मोठे यश मिळवले असेही मोदी म्हणाले.
राज्यात मोफत लसीकरण राबवण्यात येत आहे अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली तसेच प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी ऑक्सिजन आणि आयसीयू सारख्या सुविधा उत्तर प्रदेशने दिल्या आहेत, ही बाब प्रंशसनीय असून आरोग्य क्षेत्रात योगींनी उत्तम काम केले आहे असे मोदी म्हणाले.



























































