ट्रेनीसाठी कोल इंडिया लिमिटेडमध्ये 125 जागा

कोल इंडिया लिमिटेडमध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनीसाठी एकूण 125 जागांची भरती केली जात आहे. या पदांसाठी 26 डिसेंबरपासून अर्ज करता येणार असून अखेरची तारीख 15 जानेवारी 2026 पर्यंत आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती www.coalindia.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. ट्रेनीचा काळ हा 15 महिन्यांसाठी असणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दर महिना 22 हजार स्टायपेंड दिला जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय सर्वसाधारण गट 28 वर्षे, ओबीसी वर्ग 31 वर्षे आणि एससी, एसटी प्रवर्ग 33 वर्षांपेक्षा जास्त वय नसावे.