कोळसा घोटाळा- वाजपेयी सरकारमधील माजी मंत्री दिलीप रे यांना तीन वर्षे तुरुंगवास

कोळसा घोटाळाप्रकरणी नवी दिल्लीतील विशेश सीबीआय न्यायालयाने माजी मंत्री दिलीप रे यांना तीन वर्षांच्या तुरुंगकासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 1999 मधील झारखंड कोळसा ब्लॉक वितरणात झालेल्या कथित अनियमिततेशी संबंधित आहे.

झारखंडमधील कोळसा खान घोटाळ्याप्रकरणी 14 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने रे यांना दोषी ठरवले. त्यानंतर पुढील सुनावणी न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पुढे ढकलली होती.

सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. वाजपेयी सरकारमध्ये दिलीप रे हे कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (संयुक्त कार्यभार) होते. या प्रकरणात न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दोन आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

कोळसा खाण काटप घोटाळ्यात गुन्हा सिद्ध झालेले हे पहिलेच प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये कोणत्याही वरिष्ठ पदावरील व्यक्तीला आणि मंत्र्याला शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. एकत्रित मिळून कट रचणे, विश्वासघात आणि फसवणूक तसेच भ्रष्टाचारविरोधी कायद्याचा विविध कलमांखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या