खोबरेल तेलाचे भाव गगनाला भिडले! किमतीमध्ये झालेल्या तीनपट वाढीने आता फोडणी महागली

नारळाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे, आता खोबरेल तेलाची फोडणी चांगलीच महागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्राकडून कच्च्या तेलावरील आयात शुल्क हे 10 टक्के इतके कमी करण्यात आले होते. परंतु त्यानंतर इराण आणि इस्त्राइलच्या युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमती चांगल्याच भडकल्या. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये तब्बल तीनपटीने वाढ झालेली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नारळाच्या उत्पादनात होत असलेली घट हे मुख्यतः खोबरेल तेल भडकण्यास कारणीभूत आहे. नारळाच्या उत्पानावर कडक उन्हामुळे आणि किडीची लागण लागल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळेच घाऊक बाजारातील तेलाच्या किंमत आता 130 रुपये किलोंवरुन तब्बल 400 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळेच आता फोडणीसाठी केवळ खोबरेल तेलाचा वापर करणारे आता इतर खाद्य तेलाकडे वळताना दिसत आहेत.

संपूर्ण देशातच खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. यातील प्रमुख बाब म्हणजे नारळाच्या उत्पादनामध्ये झालेली घट हे आहे. त्यामुळेच गतवर्षीपासून नारळ तेलाच्या किमतीमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. केरळ, कोकण तसेच मंगलोरीयन खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने खोबरेल तेलाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच आता खोबरेल तेलाचा वापर सढळ हाताने करणारे लोक आता हे तेल अतिशय जपून वापरु लागले आहेत.

नारळाच्या उत्पादनात झालेली घट ही प्रामुख्याने भाववाढीस कारणीभूत आहे. त्यामुळेच तेल करण्यासाठी लागणारा कच्चा मालही आता चांगलाच महागला आहे. त्यामुळेच खोबरेल तेलाचे भाव आता गगनाल भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खोबरेल तेलात होणारी भेसळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच कारणास्तव आता केंद्राने किमान ही भेसळ रोखण्यावर भर द्यायला हवा. अशी मागणी आता खोबरेल तेल विक्रेते तसेच ग्राहकही करु लागले आहेत.