
अक्वालाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या कुलाबा–वांद्रे–सीप्झ–आरे मेट्रो-3 या मार्गातील प्रवाशांना आता रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा (एनसीएमसी) वापर प्रवाशांना बुधवारपासून करता येणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्डचे अनावरण करण्यात आले होते. बीकेसी–आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा 2-अ हा नुकताच सेवेत दाखल झाला. या मार्गावर प्रवासी संख्या वाढावी यासाठी एनसीएमसी कार्डचा पर्याय आणला आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पेरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने एमएमआरसीने एनसीएमसी कार्ड सुविधा सुरू केली आहे.