
इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनाचे स्टेटस ठेवून ते शेअर करणाऱया दोन तरुणांना अटक केली आहे. कुलाबा पोलिसांनी वेळीच ही कारवाई केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्यापासून रोखली. कुलाब्यातील आझाद नगरात राहणाऱया दोघा तरुणांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनाचे स्टेटस ठेवले असल्याची तक्रार एका तरुणाने पोलिसांत दिली. त्यानुसार याची तत्काळ दखल घेत कुलाबा पोलिसांनी अशा प्रकारे सामाजिक तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱया झाएद शेख (19) आणि पैफ शेख (19) या दोघा तरुणांना पकडले. या दोघांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे जातीय तेढ निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता होती. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.




























































