या आठवड्यात राज्यात थंडी परतणार; हवामान खात्याचा अंदाज

990

मकरसंक्रातीनंतर तापमानात वाढ होऊ लागते आणि थंडी ओसरते. मात्र, यंदा मुंबईत आणि राज्यात थंडीचे प्रमाण कमी होते. आठवड्याभरापासून मुंबईत आणि राज्यात सरासरी तापमानात वाढ झाली असून आता थंडी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, आठवड्याभरात मुंबईसह राज्यात थंडी परतण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यातील थंडी ओसरली असली तर उत्तर हिंदुस्थानात जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होत आहे. तसेच उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाकाही कायम आहे. आठवड्याभरात उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि शीतलहरीमुळे मुंबई आणि राज्यातील सरासरी तापमानात घट होईल. त्यामुळे राज्यात थंडी परतणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 29 ते 31 जानेवारीदरम्यान तापमानात मोठी घट होण्याची आणि थंडीचा कडाका वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या