स्वेटर, मफलर बाहेर पडले; नांदेडकर सुखावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cold-wave

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या 24 तासात पासून नांदेडकरांना सूर्यदर्शन होऊ शकले नाही शकले नाही. तरी नांदेडकर या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत. आज सकाळी नांदेडचे तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवन थोड्याफार प्रमाणात विस्कळीत झाले असले तरी गेल्या दोन महिन्यात थंडीच न पडल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र आता थंडी पडल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हरभरा, गहू या पिकाच्या वाढीला हे वातावरण पोषक असल्याचे शेती तज्ज्ञांनी सांगितले. वातवरणातील हा गारवा आणखी दोन दिवस तरी राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर, जॅकेट, कानटोप्या आता बाहेर पडले आहेत.