
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये तिकीट वाटपात कोथरूडमध्ये मोठे कोल्डवॉर झाले आहे. पेंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे बंधू श्रीधर मोहोळ यांचा पत्ता कट झाल्यानंतर आज सकाळी अचानकपणे त्यांचे मावस भाऊ नीलेश काsंढाळकर यांच्या उमेदवारीलादेखील कात्री लावण्यात आली. या तिकीट कापाकापीमागे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची रणनीती असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. भाजपचे आमदार आणि खासदार यांच्या घरामध्ये उमेदवारी द्यायची नाही, असे धोरण पक्षाने जाहीर केले. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचे बंधू श्रीधर मोहोळ यांची उमेदवारी अगोदरच कापण्यात आली होती. आज सकाळी नीलेश काsंढाळकर यांचे नाव उमेदवारांच्या यादीतून कापण्यात आले. काsंढाळकर हे पेंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे मावसभाऊ आहेत. महापालिकेची निवडणुकीची सर्व सुत्रे हातात असतानाही मोहोळ यांच्या मावसभावाचेच तिकीट पक्षाने कापल्याने मोहोळ यांना धक्का मानला जात आहे. ते स्वतःच्या सख्ख्या भावाचे आणि मावसभावाचे तिकीट देखील वाचवू शकले नाहीत.


























































