असं झालं तर…कॉलेज अॅडमिशन तारीख चुकली तर काय?

दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यावे लागते. सर्व अॅडमिशन आता ऑनलाइन झाले आहेत.

कॉलेज अॅडमिशनची तारीख चुकली तर काय करावे हे अनेकांना कळत नाही. असे काही झाले तर ज्या महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, तिथे त्वरित संपर्क करा.

तुमची परिस्थिती समजावून सांगा आणि विचारा की, उशिरा प्रवेश शक्य होऊ शकते का? काही महाविद्यालये जागा उपलब्ध असल्यावर अर्ज स्वीकारतात.

जर तुम्हाला अर्ज करण्याची संधी मिळाली, तर शक्य तितक्या लवकर अर्ज करा. काही वेळा तुम्हाला तुमची परिस्थिती स्पष्ट करणारा अर्ज सादर करावा लागू शकतो.

ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया अजून सुरू आहे, अशा इतर महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्याचा विचार करा. काही खासगी महाविद्यालये स्पॉट अॅडमिशनसाठी रिक्त जागा भरतात.