न्यायालयसामोर हजर न राहणाऱ्या 9 आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन करून पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी । परभणी
अजामीनपात्र वॉरंट बजावून देखील न्यायालयसमोर हजर न राहणाऱ्या 9 आरोपींना कोतवाली पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन करुन ताब्यात घेऊन न्यायालसमोर हजर केले. न्यायालयाने 9 आरोपींपैकी 5 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तर इतरांना दंड ठोठावून सुटका करण्यात आली.
बुधवारी रात्री कोतवाली पोलीसांनी  न्यायालयाच्या आदेशानूसार कोंम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड  यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत आरोपी महेंद्र कनाके, शेख अली तय्यब, नारायण पटरे, ज्ञानोबा  कुरम, राहुल भालेराव, प्रदीप वाघमारे, सुरेश पवार, शेख आसेफ बाबर आणि कविता रमेश काळे यांना ताब्यात घेऊन न्यायालयसामोर हजर केले . न्यायालयाने 9 आरोपींपैकी 5 जणांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दोघांना दीड हजार आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य दोघांची पी.आर. बाँडवर सुटका केली.