Commanwealth Games हिंदुस्थानला चौथे पथक, वेटलिफ्टिंगमध्ये बिंदीयाराणीने जिंकले रौप्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारचा दिवस हिंदुस्थानच्या वेटलिफ्टरने गाजवला. संकेत सरगर, गुरुराजा पुजारी व मीराबाई चानूनंतर बिंदीयाराणीने वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवले आहे. 55 किलो वजनी गटात बिंदीया राणीला रौप्य पदक मिळाले.

‘मी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत होते. रौप्य पदक मिळाल्याने मी खूप खूष झाले आहे. आजचा परफॉर्मन्स माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. माझ्या हातून सुवर्णपदक यंदा सुटले मात्र पुढच्या वेळेस मी पूर्ण प्रयत्न करेन’, असे बिंदीयाराणी हिने पदक जिंकल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

शनिवारी सांगलीचा पठ्ठ्या संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्येस रौप्य पदक पटकावत हिंदुस्थानच्या पदकांचं ओपनिंग केलं. त्यानंतर  गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक जिंकले. शनिवारी रात्री मीराबाईने सुवर्णपदक पटकावलं