
सामना ऑनलाईन । मुंबई
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी चुकीची माहिती मतदारांना देऊन आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार उच्च न्यायालयाचे वकील ऍड. धर्मेंद्र मिश्रा यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
देवरा यांनी जैन समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चुकीची माहिती पसरवून शिवसेनेची बदनामी करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनी कुमार यांच्याकडे ऍड. मिश्रा यांनी ही तक्रार केली आहे.

























































