
सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत एका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोस्ट लावलेला दिसत आहे. तसेच या फोटोआच्या पायत्याशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं पोस्टर लावलेलं दिसत आहे. हाच फोटो आता X वर पोस्ट करत काँग्रेसने भाजपवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस सेवादलाचे आपल्या X अकाउंटवर हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “राष्ट्रपतींचा अपमान करणे म्हणजे थेट संविधानाचा अपमान करणे. राष्ट्रपती संविधानाचे रक्षक असल्याने त्यांचा आदर करणे ही प्रत्येक लोकशाहीची मूलभूत जबाबदारी आहे. पण भाजपसाठी ना संविधान महत्त्वाचे आहे ना त्याची प्रतिष्ठा. हे सरकार सत्तेच्या नशेत इतके आंधळे झाले आहे की, आता त्यांना लोकशाहीची किंवा संस्थांची पर्वा नाही.”
राष्ट्रपति का अपमान यानी सीधे सीधे संविधान का अपमान!
संविधान की संरक्षक होने के नाते राष्ट्रपति का सम्मान करना हर लोकतंत्र की बुनियादी जिम्मेदारी है।
लेकिन BJP के लिए न तो संविधान मायने रखता है, न ही उसकी गरिमा।
ये सरकार सत्ता के नशे में इतनी अंधी हो चुकी है कि अब उसे न… pic.twitter.com/F8SEA8xXwl
— Congress Sevadal (@CongressSevadal) July 3, 2025
यावरूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी X वर पसोट करत म्हटलं आहे की, “राष्ट्रपतींचा असा अपमान म्हणजे संविधान पायदळी तुडवणे. राष्ट्रपती संविधानाच्या संरक्षक म्हणून काम पहातात. भाजपाने संविधान कधीच महत्वाचे मानले नाही.”