देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम होतंय, बाळासाहेब थोरात यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विधानभवनाच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

रश्मी शुक्ला यांनी बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याबाबत पत्रकारांनी थोरात यांना विचारले. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ”देवेंद्र फडणवीस हे सध्या सागर बंगल्यावर राहतायतय. त्यामुळे या बंगल्यावर सध्या वॉशिंग मशीनचं काम होतंय” असा टोला त्यांनी लगावला आहे.

विरोधकांनी जेव्हा एकनाथ शिंदे गटातील आमदार आले तेव्हा गद्दार गद्दारच्या घोषणा दिल्या होत्या. त्या बाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले की ते माझ्या मनाला लागले आहे व आम्ही त्याचे उत्तर देऊ. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अंतर्मनाला विचारलं पाहिजे की त्यांचं वागणं कसं होतं.