गोव्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

राफेलवरुन देशभरात वातावरण तापू लागले आहे.माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.आज राजधानी पणजीत तर निषेध मोर्चा घेऊन आलेले भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भिडले.

दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यां विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेले कार्यकर्ते एकमेकांना भिडले.रात्री उशिरा दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रारी नोंदवल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी एकमेकांवर पाण्याच्या,दारूच्या बाटल्या,चप्पल फेकण्यास सुरुवात केली.भाजपचा मोर्चा तेथून जाईपर्यंत घोषणाबाजी सुरु होती.