
सामना प्रतिनिधी । मंठा
मंठा तालुक्यातील देवगाव खवणे ग्रामपंचायतचे भाजपाचे उपसरपंच अमर अण्णासाहेब मोरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास मोरे, सतिष मोरे, सुभाष साळवे, विठ्ठल दहिजे, गंगाराम बिडवे यांच्यासह खोराड सावंगी जिल्हा परिषद सर्कल मधील विलास ठोकरे मित्र मंडळाच्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी रविवार वाटुर येथे झालेल्या मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मंठा तालुक्यातील अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे.

वाटूर येथील गणेश मंगल कार्यायात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार संजय जाधव, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, माधव कदम, अंकुशराव अवचार ,संतोष वरकड, प्रल्हादराव बोराडे, सुरेशराव सरोदे, हरिभाऊ चव्हाण, परतुर तालुका प्रमुख बाबाजी तेलगड, मंठा तालुकाप्रमुख अजय अवचार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप, काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. देवगाव खवणे ग्रामपंचायत भाजपाचे उपसरपंच अमर अण्णासाहेब मोरे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना भाजप नेत्यांचे विचार न पटल्यामुळे भाजपाला जयश्रीराम करीत शिवसेनेत प्रवेश केला. तर खोराड सावंगी सर्कल मधील विलास ठोकरे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी युवासेना शाखा प्रमुख सुनील सोनटक्के, सुनील खंडागळे, दत्ता घुगे यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहल हिवाळे, निवास ठोकरे, विलास ठोकरे, भाऊराव कदम, किशोर डोंगरे, निवास ठाकरे, विकास थक्रे, भाऊराव कदम, किशोर डोंगरे, आकाश ठोकरे, अशोक ठोकरे,गोविंद मानूरकर, बाळू आवटे, प्रशांत ठोकरे,संगम आवटे, विष्णू साबळे, मुंजा चावरे,सचिन गबाळे, नामदेव चावरे, दगडुबा गबाळे, सुरेश पवार, विशाल ठोकरे, चक्रधर ठोकरे, परमेश्वर ठोकरे, सदाशिव ठोकरे, दिलीप आवटे, प्रल्हाद ठोकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक बेबीताई पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदा घोडके, सुलोचना इंगळे, विमल घोडके, तारामती भिसे, शांता कांबळे, धुराबाई कवळे, धर्माबाई राठोड, नानीबाई गवते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गयाबाई पवार, रूक्मीनबाई घोडके यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी शिवसेना प्रवेशाबद्दल सर्वांचा सत्कार केला. शिवसेनेत आलेल्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी म्हटले.





























































