
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नुकतेच ढीगभर पुरावे सादर करत लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे आरोप केले होते. यानंतर आता बिहारमध्येही मतदार यादीच्या विशेष फेर तपासणीच्या (Bihar SIR) नावाखाली मतचोरीची केली जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. यात ‘दैनिक भासकर’ची एक पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट करत काँग्रेसने म्हटले आहे की, “बिहरमधील मुझफ्फरपूरमधील एका घरात 269 मतदारांची नावे आहेत. तसेच जमुई येथील एका घरात 247 मतदारांची नावे आहेत.”
या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “ही सरळसरळ मतांची चोरी आहे, ज्याचा खेळ आता उघडकीस आला आहे. निवडणूक आयोग आणि भाजप लोकशाही नष्ट करण्याचा कट रचत आहेत.”
बिहार में SIR के बाद ‘नई वोटर लिस्ट’ तैयार हुई।
इस वोटर लिस्ट में 👇
⦁ मुजफ्फरपुर के एक मकान में 269 वोटरों के नाम हैं
⦁ जमुई के एक मकान में 247 वोटरों के नाम हैंये सरासर वोट चोरी है- जिसका खेल अब सामने आ चुका है। चुनाव आयोग और BJP लोकतंत्र को तबाह करने पर तुले हुए हैं। pic.twitter.com/Acz8mteM0k
— Congress (@INCIndia) August 10, 2025