
पालघरमधील दोन साधूंच्या हत्येप्रकरणी अटक केलेले दोन आरोपी भाजपशी संबंधित आहेत. या प्रकरणातून भाजपच्या लोकांना वगळण्यात यावे म्हणूनच भाजपकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. यामध्ये भाजपकडून हीन दर्जाचे राजकारण केले जात असल्याचा घणाघाती आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी बुधवारी केला.
एप्रिल २०२० मध्ये पालघरमधील गडचिंचले गावात साधूंच्या मॉबलिंचिंग प्रकरणात अद्यापपर्यंत २२५ अटक झाल्या आहेत. १५४ हत्याप्रकरणी व ७५ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी! निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल पोलीसांवरही कारवाई करण्यात आली. सदर तपास सीआयडीकडे आहे व न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. pic.twitter.com/s6J0nxKV0t
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 18, 2020
पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून हे प्रकरण महाविकास आघाडी सरकारने गंभीरपणे हाताळत तब्बल 229 जणांना अटक केली, 154 जणांना हत्येच्या आरोपाखाली तर 75 जणांवर जमावबंदी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करून प्रकरण सीआयडीकडे दिले. आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सात महिन्यांनंतर भाजपाकडून आता सीबीआयची मागणी केली जात आहे असे सचिन सावंत म्हणाले.
पालघर साधूंच्या मॉबलिंचिंग प्रकरणात भाजपाचे हितसंबंध असल्यानेच सीबीआय चौकशी ची मागणी. भाजपाच्या या नौटंकी आंदोलनात राम नाही तर झांसाराम आहे. pic.twitter.com/ZWgKwgTLWY
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 18, 2020
इतर राज्यातील साधूंच्या हत्येचे काय ? काँग्रेसचा घणाघाती आरोप
देशभरातील इतर राज्यात झालेल्या साधु, संतांच्या हत्येवर भाजप काहीच बोलत नाही. उत्तर प्रदेश मध्ये साधूंची हत्या झाली, कर्नाटकात तीन-तीन पुजाऱ्य़ांच्या हत्या झाल्या पण त्यावर भाजप काहीच बोलत नाही. फक्त महाराष्ट्रातील साधूंच्या हत्यांवर भाजप बोलते यातून त्यांचा दांभिकपणा दिसत आहे. साधुंची हत्या, मंदिराच्या प्रश्नावरुन भाजप हिन राजकारण करत आहे, असेही सावंत म्हणाले.

























































