नागिरकांना आवाहन करणारे पंतप्रधान मोदी कर्तव्यांचे पालन करतात का? संविधान दिनी काँग्रेसचा सवाल

नागरिकांनी आपल्या घटनात्मक कर्तव्यांचे पालन करावे, असे पंतप्रधानांनी नुकतेच आवाहन केले. मात्र कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी या वक्तव्यावर प्रत्त्युत्तर देत पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.

एक्सवर पोस्ट करून जयराम रमेश यांनी म्हणाले की, संविधानातील भाग IV-A मधील कलम 51-A मध्ये नागरिकांसाठी 11 मूलभूत कर्तव्ये नमूद केली आहेत. “पण पंतप्रधान स्वतः ही कर्तव्ये पाळतात का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रमेश यांनी चार प्रमुख कर्तव्यांचा उल्लेख करत पंतप्रधानांच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

1. संविधान आणि त्यातील आदर्शांचा आदर राखणे
2. स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त मूल्यांचे पालन करणे
3. धर्म, भाषा आणि प्रांतभेदाच्या पलीकडे राष्ट्रीय एकोपा आणि बांधिलकी वाढवणे
4. विज्ञाननिष्ठ विचार, मानवतावाद आणि सुधारणा-भावना विकसित करणे

या चारही कर्तव्यांबाबत पंतप्रधानांची भूमिका “संशयास्पद” असल्याचे रमेश यांनी म्हटले असून, घटनात्मक मूल्यांवर पंतप्रधान किती खरे उतरतात हा प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनावर विरोधकाची ही तीव्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.