
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले, पण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत, शहा आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे, पण भाजप महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. अमित शहा शेतकऱ्यांना मदतीबाबत एक शब्दही बोलले नाहीत व राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले. हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे, असे सपकाळ म्हणाले. शेतकरी मरत असतानाही भाजप सरकार मदत करत नाही. हे अंत्यत दुर्दैवी आहे. तातडीने मदत जाहीर करावी याचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.