
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 16 ऑक्टोबरला नवी दिल्लीत होणार आहे. देशातील सद्य राजकीय स्थिती आणि पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम यावर या बैठकीत चर्चा होईल, असे ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केले आहे. पक्ष कार्यालयात सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवावी अशी मागणी केली होती. त्यानंतरच पक्षाने बैठक बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे.


























































