देशद्रोहा प्रकरणी हार्दिक पटेलला अटक

745
hardik patel

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना विरमगांव येथून हासलपूर येथून अटक करण्यात आली आहे. एका देशद्रोहच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.

पाटीदार आरक्षण समर्थनार्थ 25 ऑगस्ट 2015 ला हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती. त्यावेळी संपूर्ण गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने सतत त्यांना समन्स बजावून देखील ते न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या