भाजपचे ‘गुप्त रोग’ सांगून दिग्विजय सिंह झाले ट्रोल

digvijay-singh
मध्य प्रदेशचे 10 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविलेले दिग्विजय सिंह हे देखील पराभूत झाले आहेत. भोपाळ लोकसभा मतदारसंघात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. भाजपने जनतेपासून लपवून ठेवलेल्या गोष्टींना सिंह यांनी भाजपचे ‘गुप्त रोग’ म्हटलं आहे. यामुळे नाराज झालेल्या भाजप समर्थक नेटकऱ्यांनी सिंह यांनाच ट्रोल करण्यास सुरुवात केली असून हे गुप्त रोग काँग्रेसचीच देण असल्याचे म्हटले आहे. यामुळे दिग्विजय सिंह आणि भाजप समर्थक नेटकरी यांच्यात टि्वटर वॉर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दिग्विजय सिंह यांनी भाजपवर हल्ला करणारं जोरदार ट्विट केलं आहे. ‘राफेल डिल गुप्त, जुन्या नोटांची मोजणी गुप्त, काळा पैसा किती मिळाला गुप्त, जीएसटीनंतर किती कर मिळाला ते गुप्त, नोकरी कितीजणांना मिळाली ते गुप्त, वाराणसी पूलाचा कंत्राट कोणाला दिला ते गुप्त. हे गुप्त रोग बरे तरी होणार का की, यांनाच घेऊन तुम्ही जाणार’, असे टि्वट करत  सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सिंह यांचे हे ट्वीट भाजप व त्यांच्या समर्थकांच्या चांगलेच जिव्हारी लागले. यामुळे विजय महाजन या यूझर्सने काँग्रेसच्या सत्ताकाळातील घोटाळ्यांची यादीच टि्वटवर जाहीर केली. पनामा पेपर्स, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, टू जी घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, जबरदस्तीने केलेली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, कश्मीरी पंडित, ४० लाख घुसखोर, विजय मल्ल्या आणि नीरव मोदींचे कर्ज, स्वीस बँकेतील पैसा, चीनला दिलेली जमीन हे सर्व काँग्रेसचे गुप्त रोग असल्याचे ट्वीट करत त्याने सिंह यांच्यावर पलटवार केला.

तर काही यूझर्सने पूर्ण काँग्रेसलाच गुप्त रोग जडला असून वेळीच उपचार करा, नाहीतर अनेक वेगळे आजार बाहेर येतील, असं म्हटलं आहे. तर एका यूझरने हिंदुस्थानसाठी काँग्रेसच एक गुप्त रोग आहे. जेव्हा या रोगाचे उच्चाटन होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल असं म्हटलं आहे.

यासंदर्भात जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की वसाहती मधील पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन वारंवार फुटत आहे. त्यामुळे पाईप लाईनच्या दुरूस्तीच्या कामामुळे येथील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

summary…congress-leader-digvijaya-singh-troll-comment-demerit-bjp