
अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील माहोळ गावात प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मशिदीतून नमाज अदा करून बाहेर पडत असताना कोयत्याने त्यांच्या मानेवर हल्ला करण्यात आला. उबेद पटेल असे हल्लेखोराचे नाव असून सध्या तो फरार आहे.
मंगळवारी दुपारी हिदायत पटेल हे मोहोळ गावातील मशिदीत नमाजासाठी गेले होते. नमाज अदा केल्यानंतर मिशिदीतून बाहेर पडत असतानाच उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्याने पटेल यांच्या मानेवर व पोटावर धारदार चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत हिदायत पटेल यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोल्यातील रुग्णालयात हलविण्यात आले.


































































