तुम्ही मंगळावर राहतात का? निवडणुका पुढे ढकलण्याच्या याचिकेवर न्यायालयाचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

न्यायालयाने शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असून कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. तुम्ही मंगळ ग्रहावर राहता काय,असा सवाल याचिकाकर्त्यांना केला. देशात कोरोना नियंत्रणात येत असताना अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आल्याने न्यायाधीश विपिन सांघी आणि न्यायाधीश जसमित सिंह यांच्या पीठाने नाराजी व्यक्त केली.

राजधीन नवी दिल्लीसह देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे. कोरोना नियंत्रणात येत आहेत. तुम्ही मंगळ ग्रहावर राहता काय, असा सवाल न्यायालयाने केला. तुम्ही ही याचिका मागे घ्या किंवा आम्ही ती रद्द करतो, असे पीठाने सुनावल्यावर शर्मा यांनी आपली याचिका मागे घेतली. कोरोनाचा फैलाव लक्षात घेता पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकल्याव्या. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांना कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आणि ऑक्यिजनची उपलब्धता वाढवण्याचे निर्देश द्यावे, असे शर्मा यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणीपूर या राज्यांच्या विधानसभा 10 फेब्रुवारी आणि 7 मार्चदरम्यान निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांशी जानेवारीमध्ये चर्चा केली होती. त्यावेळी सर्व पक्षांनी निवडणुका वेळेतच घेण्याची मागणी केली होती. कोणत्याही पक्षाने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली नव्हती. मात्र, कोरोनाचा फैलाव लक्षआत घेत निवडणूक आयोगाने काही सभआ आणि प्रचारवार काही निर्बंध लागू केले आहे.