
सामना ऑनलाईन । सोलापूर
सोलापूर विजापूर महामार्गावर तैरामल येथे काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात निंबाळकर व चालक जखमी झाल्या असून त्यांना सोलापूरमध्ये एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
खानापुरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा सोलापुरजवळ भीषण अपघात झाला. या अपघात त्यांच्या डोक्याला मार लागला आहे, तर गाडीच्या चालकाला छातीला मार लागला आहे. अंजली निंबाळकर यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सविस्तर वृत्त लवकरच


























































